लोकांकडून सोशल मीडियावर टीकेचा भडिमार
पैसे वाया घालविणे म्हणजे काय असते हे पोलिसांच्या एका कृत्यातून समजणार आहे. एका छोटय़ा सायकलला एका मोठय़ा ट्रकमधून नेण्यात आल्यास आणि हे काम पोलिसांनी केल्यास संताप होणे साहजिक आहे. अशीच घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. येथील वेस्ट मर्सियामध्ये एका छोटय़ा इलेक्ट्रिक स्कुटरला नेण्यासाटी पोलिसांनी ट्रकच (टक्कर) मागविला.
या स्कुटरचे वजन केवळ 15 किलो होते. 4 जून रोजी ही स्कुटर ताब्यात घेण्यात आली होती. विभागाने याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. याचबरोबर विभागाने इलेक्ट्रिक सायकलशी संबंधित नियमही सांगितले आहेत. विम्याशिवाय सायकल असल्यास 300 युरोपर्यंतचा दंड होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या पोस्टला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक जणांनी शेअर केले आहे. या ट्रकमधून अशा 10-15 बाइक्स वाहून नेता आल्या असत्या असे एका युजरने म्हटले आहे.