ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात सप्टेंबर महिन्यानंतरची उच्चांकी रुग्णवाढ तर नोव्हेंबरनंतरची सर्वाधिक मृत्यू संख्या नोंदवली गेली. मागील 24 तासात देशात 81 हजार 466 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 23 लाख 03 हजार 131 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 63 हजार 396 एवढी आहे.
गुरुवारी 50,356 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 25 हजार 039 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 6 लाख 14 हजार 696 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 6 कोटी 87 लाख 89 हजार 138 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 24 कोटी 59 लाख 12 हजार 587 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 13 हजार 966 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.01) करण्यात आल्या.