पेडणे / प्रतिनिधी
पेठेचावाडा कोरगाव येथील उल्हास बापू शेटय़े 61 यांचे सोमवारी दुपारी हृदय विकाराच्या झटक्मयाने निधन झाले. शिक्षण , समाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात शेटय़े यांचे मोठे योगदान होते. कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे ते अध्यक्ष होते. श्री साळेश्वर देवस्थान कोरगावचे ते अध्यक्ष होते. अखिल गोमंतक क्षञिय मराठा समाजाचे ते उपाध्यक्ष होते. अखिल गोमंतक क्षञिय मराठा समाज समिती मुरगावचे ते माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार संभाळला.
मुरगाव येथील मंगलजी शिप बिल्डिंग कंपनीत ते कामाला होते.मुरगाव येथे कामाला असताना शेटय़े यांनी कोरगावातील तसेच पेडणे तालुक्मयात अनेक युवकांना नोकरीसाठी शिफारस करत नोकरी त्यांना मिळवून दिली. समाज क्षेत्रात , शैक्षणिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रातील अनेकाशी त्यांचे चांगले संबंध होते.
वास्कोत पेडणेतील कोणही व्यक्ती गेली कि आवर्जून उल्हास शेटय़े यांची आठवण काढत आमच्या पेडणेचा उल्हास शेटय़े म्हणून ओळख सांगत होते. कोरगाव गावातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात , शैक्षणिक उपक्रमात तसेच देवस्थानच्या धार्मिक आणि समाजिक कार्यात नेहमीच त्याचा सहभाग असे. त्यांच्या निधनाचे वृत्त संध्याकाळी सोशल मिडियावर पसरले त्यावेळी अनेकानी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
सोमवारी सायंकाळी उशीरा पेठेचावाडा येथील स्थानिक स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पत्नी , एक मुलगा , विवाहित कन्या , भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे. कोरगावचे माजी पंचसदस्य रामा शेटय़े यांचे ते बंधू होत.