प्रतिनिधी / सातारा :
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला एकीवच्या धबधब्यात पाय घसरून पडलेली तरूणी श्वेता मुकुंद साठे (वय 18, रा. रामराव पवार नगर, गोडोली) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला व पोटाला मार लागल्याने तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी श्वेता साठे साताऱ्यातील कास येथील ऐकीव धबधबा पाहण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती. यावेळी तिचा पाय घसरल्याने ती ऐकीवच्या धबधब्यात पडली. मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले व त्यांनी श्वेता हिला बाहेर काढले. यावेळी तिच्या डोक्याला इजा झाली होती. यामुळे तिला साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला व पोटाला मार लागला आहे. मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.