नवी दिल्ली
सुटय़ा भागांची निर्मिती करणारी एम एम फोर्जिंग्स लिमिटेड यांनी कॅफोमा ऑटो पार्ट्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. सदरचे अधिग्रहण हे 33 कोटी रुपये देऊन करण्यात आले. सदरची माहिती कंपनीने शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. ट्रक्टर आणि औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱया मशीनयुक्त क्रँकशाफ्टच्या पुरवठय़ामध्ये काफोमा ऑटो कंपनीचा वाटा अधिक आहे. एमएम फोर्जिंग्सने व्यवहारात 28 कोटी रुपये रोख स्वरूपात कॅफोमाला दिले आहेत.