नवी दिल्ली
फॅशन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी मिंत्राचे सीईओ अमर नागाराम यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. गेल्या 3 वर्षापासून ते या पदावर कार्यरत होते. नागाराम हे आता आपला नवा व्यवसाय सुरू करणार आहेत, असे सांगितले जाते. फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी आपल्या कर्मचाऱयांना पाठवलेल्या इमेलमध्ये नागाराम हे डिसेंबर अखेरपर्यंत पदावर राहतील, असं म्हटलं आहे. त्यानंतर ते कंपनीत सल्लागाराची भूमिका बजावतील.