बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद एम. कारजोळ यांनी मंगळवारी कोरोनाची लाग झाल्याचे निष्पन्न झाले. उपमुख्यमंत्री कारजोळ यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजप नेते बेंगळूर विधान सौध येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री कारजोळ यांनी माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.