ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पुलवामात सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. त्या दहशतवाद्याकडील शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
पुलवामा आणि बडगाम भागात दहशतवाद्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या भागात सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस अनेकदा शोधमोहिम राबवतात.