बेंगळूर/ प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकात कोरोना संसर्गाची ५,८५१ नवीन प्रकरणे समोर आली. बेंगळूरमध्ये १९१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे सोमवारी राज्यातील ८,०६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ८१,२११ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात सोमवारी चोवीस तासात एकूण १३० कोरोना बाधित रूग्णांचा बळी गेला, त्यापैकी २६ बेंगळूर मधील आहेत. त्याच वेळी, बळ्ळारीमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या ३४,७३५ वर गेली. सोमवारी २०३४ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १६९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.