बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान कर्नाटकात सलग कोरोना रुग्णवाढीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली होती. आत बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाने बुधवारी ५०० चा टप्पा ओलांडला.
राज्यात बुधवारी ५२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ४१३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,०५७ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या बेंगळूरमध्येच आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात ३११ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २३५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,४८९ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.