नवी दिल्ली
कॅनरा बँकेने कर्जावरचे व्याजदर नुकतेच घटवण्याची घोषणा केली. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट बँकेने 40 बेसीस पॉईंटने कमी केला आहे. बँकेचा नवा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 6.90 टक्के इतका असेल. नवे सुधारीत बँकेचे व्याजदर 7 जूनपासून अंमलात आले आहेत. यापूर्वी पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया व युको बँक यांनीही रेपोशी निगडीत व्याजदर 0.40 टक्के कमी केला आहे.