ऑनलाईन टीम/तरुण भारत
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ज्या कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापे टाकले होते ती क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसहीत त्याच्या मित्र्यांना ज्या क्रूझवरुन अटक करण्यात आली ती क्रूझ पुन्हा चर्चेत येण्यामागील कारण आहे कोरोना. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच या क्रूझवरील ६६ प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी ही माहिती दिलीय.
कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. ही क्रूझ मुंबईहून गोव्याला गेली होती. गोव्यात गेल्यानंतर क्रुझवरील ६६ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालानंतर समोर आले आहे. आता ही क्रूझ मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई पालिकेकडून ५ ऍम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्वांची मुंबई पालिकेचे विशेष पथक तपासणी करणार आहे. तर दोन आरटीपीसीआर लॅब ही तैनात करण्यात आल्या आहेत.