प्रतिनिधी / सातारा :
कोकण कृषी विद्यापीठातर्फे उत्कृष्ठ कामगिरी तसेच सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुवर्णपदकाने सन्मान केला जातो. विशेष म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाच्या या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे आखाडे (ता. जावली) गावचा प्रतीक अशोक सरकाळे. त्याच्या या यशामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु संजय सावंत यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन प्रतीकचा सन्मान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ, कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. चारुदत्त मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शरदचंद्र पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या 39 व्या पदवीप्रदान कार्यक्रमात पडला. या कार्यक्रमात कुलपती तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषीमंत्री दादा भुसे हेदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
2016-17 ते 2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रतीक अशोक सरकाळे याने उत्कृष्ठ कामगिरी करुन सर्वाधिक गुण मिळून अन्नतंत्रज्ञान विभात सुवर्णपदक पटकावले आहे.