दोन लॅब टेक्निशियन पॉझिटिव्ह : खानयाळेत एकाच घरातील नऊजण पॉझिटिव्ह
- जिल्हय़ात आणखी 18 पॉझिटिव्ह, 11 जणांना डिस्चार्ज
- 387 जण कोरोना मुक्त, सक्रिय रुग्णसंख्या 161
- गुरुवारी 1 हजार 498 चाकरमानी जिल्हय़ात दाखल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात गुरुवारी आणखी 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेमधेच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन लॅब टेक्निशियनना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोडामार्ग तालुक्मयातील खानयाळे गावातील एकाच कुटुंबातील नऊजण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गुरुवारी आणखी 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी 1 हजार 498 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात गुरुवारी आणखी 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित एकूण रुग्णसंख्या 556 वर पोहोचली आहे. तर आणखी 11 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत 387 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 161 रुग्ण आहेत.
नव्याने आढळलेल्या 18 रुग्णांमध्ये दोडामार्ग तालुक्मयात सर्वाधिक 11 रुग्ण असून खानयाळे गावात एकाच कुटुंबातील नऊ रुग्ण आहेत, तर दोडामार्ग – एक आणि कुंब्रल – एक, देवगड तालुक्मयातील देवगड किल्ला – एक, देवगड कॉलेजरोड – एक, जामसंडे – एक, कुडाळ तालुक्मयातील ओरोस – दोन आणि रॅपिड टेस्टमध्ये दोन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची गावे समजू शकली नाहीत.
ओरोसमध्ये जे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, ते ओरोस गावातील नसून कोविडची तपासणी करण्यात येणाऱया प्रयोगशाळेतील दोन लॅब टेक्निशियन आहेत. जिल्हा रुग्णालयात यापूर्वी तीन नर्स, एक वार्ड बॉय, एक महिला कक्ष सेविका, पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता थेट कोविड-19 प्रयोगशाळेमध्येच कोरोनाचा शिरकाव होऊन दोन कर्मचाऱयांना लागण झाली आहे.
गुरुवारी 1 हजार 498 चाकरमानी दाखल
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना शासनाने सवलती देत 12 ऑगस्टपर्यंत येणाऱयांना 14 ऐवजी दहा दिवसांच्या होम क्वांरटाईनची सवलत होती. ही मुदत 12 ऑगस्टला संपली. या मुदतीत 1 ते 12 ऑगस्टपर्यंत 35 हजार चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले. त्यानंतर मुदतीनंतर आता 13 ऑगस्टला एका दिवसात 1 हजार 498 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले. तर 1 ते 13 ऑगस्टपर्यंत 36 हजार 593 चाकरमानी आले आहेत. आता येणाऱया चाकरमान्यांना आगमनाच्या 48 तास अगोदर कोविड चाचणी करून यावे लागणार आहे आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह आवश्यक असणार आहे तसेच तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
कंटेनमेंट झोन
देवगड तालुक्मयातील पुरळ पुजारेवाडी येथील यशवंत गंगाराम पुजारे यांच्या घरापुरताचा परिसर, कणकवली तालुक्मयातील जांभूळगाव येथील अनिकेत मोहन चव्हाण यांच्या घरापुरता 50 मीटर परिसर, खारेपाटण येथील पवन राजाराम कावले यांच्या घरापुरता 50 मीटर परिसर, खारेपाटण येथील परशुराम प्रभू वॉस्टर राहत असलेली मंगलमूर्ती रेसिडेन्सी व 50 मीटर परिसर, खारेपाटण येथील राधिका राजेंद्र तावडे यांचे घर व 50 मीटर परिसर, फोंडा येथील विद्या विश्वनाथ राणे राहत असलेली माऊली रेसिडेन्सी बिल्डिंग व 50 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या कंटेनमेंट झोनमध्ये 25 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 8705
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 556
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 7865
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 284
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 161
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 387
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 21833
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4045
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 197025
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 55