देशात सध्या 1 लाख 76 हजार 498 कोरोना सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सध्या 1 लाख 76 हजार 498 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 कोटी 3 लाख 59 हजार 305 झाली आहे. कोरोनामुळे देशात मागील 24 तासांमध्ये 137 मृत्यूही झाले आहेत. देशाचे कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.91 टक्के आहे तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 1.65 टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.44 टक्के आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1 लाख 53 हजार 724 जणांचा मृत्यू झाला. तसेच आतापर्यंत देशात 1 कोटी 6 लाख 89 हजार 527 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय रुण
मागील 24 तासांमध्ये 12 हजार 689 नवे कोरोना रुग्ण आढळले तसेच 13 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत देशात 19 कोटी 36 लाख 13 हजार 120 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 5 लाख 50 हजार 426 कोरोना चाचण्या प्रजासत्ताक दिनी झाल्या. भारतातील 1 लाख 76 हजार 498 कोरोना सक्रिय रुग्णांपैकी 71 हजार 843 रुग्ण फक्त केरळ या एकाच राज्याचे आहेत.