नवी दिल्ली / प्रतिनिधी
जानेवारीपासून भारतातील कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाची व्याप्ती 15-18 वयोगटातील मुलांपर्यंत वाढवली जात असून, याद्वारे को-विन प्लॅटफॉर्मवर मुलांना त्यांच्या लसीकरणासाठी नोंदणी करण्यास मदत करेल. को-विनवर नोंदणी करण्यासाठी वैध ओळखपत्र म्हणून विद्यार्थी ओळखपत्र जोडण्यास परवानगी मिऴाली आहे.”
“15-18 वयोगटातील मुले 1 जानेवारीपासून को-विन अॅपवर नोंदणी करू शकतील. आम्ही नोंदणीसाठी अतिरिक्त ओळखपत्र म्हणून विद्यार्थी ओळखपत्र जोडले आहे. कारण काही लोकांकडे आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्रे नसू शकतात” असे लसीकरण अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले. 3 जानेवारीपासून सुरू होणार्या या कार्यक्रमात या वयोगटासाठी फक्त भारत बायोटेकचे कोवॅक्सिन उपलब्ध होईल. या गटात समावेश असणारी लोकसंख्या अंदाजे सात ते आठ कोटी आहे,