कंग्राळी बुद्रुक येथील घटना : 5 जणांवर एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
घरासमोरील कट्टय़ावर बसलेल्या दोन तरुणांवर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री चर्च गल्ली कंग्राळी बुदुक येथे घटना घडली असून या प्रकरणी पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.
विजय सिद्धाप्पा कुरी (वय 18), महेश शंकर कुरी (वय 16 दोघेही रा. कंग्राळी बुद्रुक) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कंग्राळी बुद्रुक येथील बाळू व बसवणकोळ येथील किरण यांच्यासह एकूण पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाळेत असताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसान खुनी हल्ल्यात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दोघांवर चाकू व रॉडने हल्ला करण्यात आला आहे.