वार्ताहर/ खडकलाट
खडकलाट ग्राम पंचायत व्याप्तीत तपकारवाडी, मनोचीवाडी, पिरवाडी, लाटवाडी, लक्ष्मीकोडी आदीसह शेतवाडीचा समावेश आहे. प्रत्येकवषी खडकलाट ग्राम पंचायतीकडून योग्य प्रकारे नियोजन करून 80 ते 90 टक्के फाळा वसुली करण्यात येते. पण इतक्मया मोठय़ा प्रमाणात फाळा वसुली करूनही आतापर्यंतची अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त फाळा वसुली बाकी आहे.
गावची लोकसंख्या सुमारे 20 ते 25 हजाराच्या आसपास असून चिकोडी तालुक्मयातील मोठे गाव म्हणून खडकलाटची ओळख आहे. येथील नागरिक सूज्ञ आणि सुशिक्षित असून मार्च महिन्यात घरफाळा, पाणीपट्टी आणि इतर फाळा भरून गावच्या विकासाला आपले योगदान देतात. येथील 80 टक्के कुटुंबे वर्षाला वेळेत फाळा भरतात. यामुळे गावात विविध विकासकामे राबविण्यासाठी सदर रक्कम उपयुक्त ठरते. वर्षाकाठी फाळा रुपात 40 लाख रुपये जमा होतात. मात्र ग्रामंचायत निर्मितीपासून थकीत असणाऱया फाळय़ामध्ये वर्षाकाठी वाढच होत आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी दररोज घरोघरी फिरून घरफाळा वसूल करीत आहेत. यातून 2020-21 सालात 33 लाख 65 हजार 694 रुपये वसूल करण्यात आले आहेत. आतापर्यंची एकूण थकबाकी 2 कोटी 58 लाख 47 हजार 213 रुपये आहे. याठिकाणी 2617 कुटुंबे असून खडकलाट-2 कोटी 41 लाख 18 हजार 738 रुपये, तपकारवाडी- 7 लाख 35 हजार 292 रुपये, मनोचीवाडी-6 लाख 17 हजार 287 रुपये, पिरवाडी-3 लाख 75 हजार 896 रुपये असे एकूण 2 कोटी 58 लाख 47 हजार 213 रुपये फाळा येणे बाकी आहे. फक्त खडकलाट गावच्या एकूण फाळय़ापैकी 84 लाख 39 हजार 540 रुपये पाणीपट्टी असून 13 लाख 62 हजार 767 रुपये घर फाळा भरणे बाकी आहे. थकबाकी असलेले आजी-माजी ग्रामसेवक राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिकांनी पंचायतीला फाळा भरून सहकार्य केल्यास गावाच्या विकासात मोठे भर पडणार आहे. याची दखल घेत थकबाकी भरुन गावच्या विकासाला हातभार लावावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
वेळेत घरफाळा भरुन सहकार्य करावे
गावात सर्व नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. गावात सर्वत्र नवीन पाईपलाईन घालून नळांना सुरळीत पाणी पुरवठा झाल्याशिवाय पाणीपट्टी सुरू करणार नाही. मात्र पाणीपट्टी वगळता इतर फाळा नागरिकांनी वेळेत भरुन सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील यांनी दिले.