प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील मौजे शिवतर व मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतर कोंड येथे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेडचा रहीम इलेव्हन ‘शिवतर चषका’चा मानकरी ठरला. मुरडेच्या एमसीसी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तीन दिवशीय क्रिकेट स्पर्धेत राज्यातून 25 हून अधिक संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास 33,333 रूपये व उपविजेत्यास 22,222 रूपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रहीम इलेव्हनच्या सौरभ, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून एमसीसी मुरडेच्या संतोष विठमलला गौरवण्यात आले. पंच म्हणून राकेश मोरे, हुमणे, तर समालोचन सिद्दीक मेनन यांनी केले. बक्षीस वितरणप्रसंगी काशिनाथ मोरे, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.