तरुण भारत संवाद बोरगाव / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 125 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी बुधवारी रात्री पाच जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.
आज गुरुवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार आणखीन तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .खाजगी लॅब मधून हे अहवाल मिळाले आहेत यामध्ये अक्कलकोट शहरातील बुधवार पेठ भागातील दोन आणि व्हटकर गल्लीतील एक व्यक्तीचा समावेश होतो. म्हणजे अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्रीतून आठ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची नोंद घेण्यात आली आहे
तालुक्यात आढळलेल्या अक्कलकोट शहर व गुरववाडी येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या 25 जणांचे स्वॅब मंगळवारी घेण्यात आले होते. त्यापैकी 31अहवाल निगेटिव्ह आले होते, तर 14 अहवाल प्रलंबित होते. प्रलंबित असलेल्या 14 अहवालापैकी
8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे . यामध्ये अक्कलकोटमधील चार जण असून एक व्यक्ती गुरववाडी परिसरातील आहे. तर आणखी सहाजणांचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार मरोड यांनी दिली.