प्रतिनिधी/ पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी कोरोनाचा 1 बळी गेला असून एकूण मृतांचा आकडा 687 झाला आहे. काल 115 नवे बाधित सापडले तर 135 जण बरे झाल्याने घरी परतले. गोव्याबाहेरुन आलेल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना संशयित म्हणून 44 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 34 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 1327 सक्रिय कोरोना रुग्ण असून ते विविध हॉस्पिटल्स, कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. आतापर्यंत मिळून एकूळा 47804 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 45790 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली – 24, सांखळी – 28, पेडणे – 31, वाळपई – 23, म्हापसा – 44, पणजी – 82, हळदोणा – 25, बेतकी – 25, कांदोळी – 74, कासारवर्णे – 6, कोलवाळ – 19, खोर्ली – 29, चिंबल – 68, शिवोली – 46, पर्वरी – 102, मये – 19, कुडचडे – 16, काणकोण – 31, मडगांव – 109, वास्को – 67, बाळ्ळी – 14, कासावली – 47, चिंचिणी – 31, कुठ्ठाळी – 56, कुडतरी – 31, लोटली – 40, मडकई – 23, केपे – 27, सांगे – 9, शिरोडा – 22, धारबांदोडा – 12, फोंडा – 104, नावेली – 36.