प्रतिनिधी / मडगाव
घोगळ हाऊसिंग बोर्डमधील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्टच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेशजयंतीनिमित्त विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे 14 व 15 फेबुवारी रोजी संध्या. 7 ते 8.30 या वेळेत गोव्यातील बालकिर्तनकार कु. भास्कर देवेंद्र साठी यांची कीर्तने होणार आहेत. संवादिनीवरती देवेंद्र साठे व तबल्यावर गौतम परब हे साथ संगत करतील, तरी सर्व भाविक श्रोत्यांनी कीर्तनश्रवणाचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात येत आहे.