अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीकडून 18 कलमी कार्यक्रमाची घोषणा
जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूच्या उदेकासाठी चीनच जबाबदार आहे, अशी अमेरिकेची खात्री पटत असून चीनला जबाबदार धरण्यासाठी तो देश वेगाने पावले टाकत आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहातील ज्ये÷ सदस्य थॉम टिल्लीस यांनी यासंदर्भात 18 कलमी कार्यक्रम तयार केला असून चीनवर त्यात गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी भारताबरोबर दृढ सैनिकी संबंध ठेवण्याची महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा उदेक वर्षभरापूर्वीच प्रथम चीनमध्ये झाला होता. हा विषाणू चीनच्या वुहान येथील जैविक प्रयोगशाळांमध्ये कृत्रिमरीत्या तयार करण्यात आला आहे, असाही आरोप करण्यात येत आहे. चीनने हेतुपुरस्सर या विषाणूच्या उदेकाची माहिती जगापासून लपवून ठेवली. जगात हा विषाणू पसरू दिला. त्यायोगे जगाची अर्थव्यवस्था धोक्मयात आणली. यासाठी चीनला जबाबदार धरणे आवश्यक असून त्याच्याकडून नुकसानभरपाई घेतली पाहिजे. तसेच चीनवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे, असे टिल्लीस यांच्या कार्यक्रमात प्रतिपादन करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिल्लीस यांच्या कार्यक्रमाला समर्थन दिले असल्याचे समजते.
प्रशांत महासागर योजना
चीनच्या आर्थिक आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षेने तसेच विस्तारवादाने आता राक्षसी स्वरुप धारण केले आहे. त्याला वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. अन्यथा चीन जगाला आणि अमेरिकेला सर्वात मोठा धोका म्हणून पुढे येण्याची शक्मयता आहे. चीनला रोखण्यासाठी प्रशांत महासागरात अमेरिकेने आपले सैन्यबळ वाढविणे आवश्यक आहे. याकामी त्याला भारताचे मोलाचे सहकार्य मिळू शकते. भारताप्रमाणेच तैवान आणि व्हिएतनाम या देशांचे सहकार्य घेणेही आवश्यक आहे. चीनविरोधात या देशांची एक साखळी प्रशांत महासागरीय क्षेत्रात बनविल्यास चीनला वेसण घालणे शक्मय होईल. अमेरिकेने यासाठी 2 हजार कोटी डॉलर्सची योजना आखावी, अशी सूचना टिल्लीस यांनी केली आहे.
पुरवठा साखळी तोडावी
अमेरिकेचे अनेक उद्योग सुटेभाग आणि कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहेत. अमेरिकेने चीनमधील आपले उद्योग तेथून काढून घ्यावेत. तसेच चीनी मालाच्या पुरवठय़ाची साखळी तोडावी. तसे केल्यास चीनला आर्थिक फटका बसून तो देश वठणीवर येईल. अमेरिकेने मनात आणल्यास हे अशक्मय नाही. अमेरिकेप्रमाणेच युरोपलाही चीनच्या बेजबाबदार वर्तनाचा कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रचंड तडाखा बसला आहे. अमेरिकेला चीनविरोधात युरोपियन महासत्तांनीही सहकार्य करावे, असे टिल्लीस यांनी सुचविले आहे. अमेरिकेच्या सिनेटचे सदस्य जॉन बॅरॅसो यांनीही चीनवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
चीनमधील गुंतवणूक काढणार : ट्रम्प
चीनला धडा शिकविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका चीनमधील गुंतवणूक काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करत असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रारंभीचा दणका म्हणून चीनमध्ये गुंतविलेले अमेरिकेचे निवृत्ती वेतन निधी काढून घेण्यात येणार आहेत. ही गुंतवणूक साधारणतः 100 अब्ज डॉलर्सची असल्याचे सांगण्यात येते. ती काढून घेतल्यास चीनच्या अनेक निवृत्ती वेतन निधी योजना कोसळण्याच्या बेतात येऊ शकतात. त्याचप्रमाणे अमेरिकेतील चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घालण्यात येणार असून या कंपन्यांनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या नियमांचे कठोर पालन करावे, अशी सक्ती करण्यात येणार आहे.
लघुचित्रपटांची स्पर्धा आता ऑनलाईन
लंडन येथील भारतीय चित्रपट महोत्सवाच्याअंतर्गत घेतली जाणारी सत्यजित रे लघुचित्रपट स्पर्धा आता कोरोना संकटामुळे ऑनलाईन घेतली जाणार आहे. ब्रिटनमध्ये चित्रपटगृहे बंद असल्याने हा उपाय शोधण्यात आला आहे. लंडन भारतीय चित्रपट महोत्सवाला ब्रिटिश चित्रपट संस्थेचा पाठिंबा आहे. तसेच बाग्री फाऊंडेशननेही साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सत्यजित रे स्पर्धेला दरवषी उत्कृष्ट प्रतिसाद लाभतो. यंदाही कोरोना भीतीवर मात करत जगभरातील अनेक लघुचित्रपटकार भाग घेतील, असा आशावाद व्यक्त केला आहे. आला आहे. या चित्रपट स्पर्धेत प्रामुख्याने तरुण चित्रपट निर्माते भाग घेत असतात.
चीनमध्ये 15 नवे रुग्ण
कोरोनाचा प्रथम उदेक झालेल्या आणि त्यावर नियंत्रण मिळविणारा पहिला देश ठरलेल्या चीनमध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या 15 रुग्णांमध्ये 11 लक्षणे न दिसणारे रुग्ण असल्याने या देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उदेक होणार काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. चीनमधील तज्ञांनी प्रशासनाला सावध केले असून प्रारंभापासूनच सजग रहा, अशी सूचना केली आहे. ज्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता तेथील व्यवहार आता सुरळीत झाले असले तरी भीती संपलेली नाही.
सिंगापुरात बाधितांच्या संख्येत वाढ
सिंगापूर या देशात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या संख्येत 793 ची भर पडली आहे. यापैकी बहुतेक जण विदेशी कामगार असल्याचे सांगण्यात आले आहे. सिंगापूरमधील कोरोना बाधित प्रकरणांपैकी 95 टक्के लोक विदेशी नागरिक असून ते कामासाठी सिंगापूरमध्ये वास्तव्य करीत आहेत. यात साधारणतः 30 टक्के भारतीय असून उर्वरित प्रामुख्याने चिनी कामगार असल्याचे समजते. चिनी कामगारांमध्ये कोरोनाची लागण अधिक प्रमाणात असून प्रसारही झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे सिंगापूर प्रशासनाने त्यांची व्यवस्था स्वतंत्र जागांमध्ये केली आहे.
कोरोना उदेकाचा आर्थिक फटका प्रचंड
कोरोना व्हायरसच्या उदेकामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला 8.8 लाख कोटी डॉलर्सचा फटका बसण्याचे अनुमान आशिया विकास बँकेने व्यक्त केले आहे. आर्थिकदृष्टय़ा सुसंपन्न असणाऱया आणि जगाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये साधारणतः 75 टक्के वाटा असणाऱया आर्थिक महासत्तांना कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या देशांमध्ये गेले दोन महिने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी जगाचे आयात-निर्यात व्यवहार थंडावले असून उलाढाल लाखो कोटी डॉलर्सनी कमी होणार आहे.