वृत्तसंस्था / मुंबई :
जागतिक बाजारांमधील घसरणीच्या प्रभावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी दिवसअखेर 323 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक अनिश्चिततेच्या संकेतामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारासोबत देशातील बाजार प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहेत.
प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीमधील समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स 323 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,979.85 वर बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 88.45 अंकांच्या घसरणीसह 11,516.10 वर बंद झाल्याची नोंद आहे.
दिवसभरात समभागामध्ये सर्वाधिक नुकसानीचा फटका हा बजाज फिनसर्व्हला बसला असून यांचे समभाग जवळपास 2 टक्क्मयांनी घसरले आहेत. तसेच अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, टीसीएस आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झालेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक तसेच एचडीएफसीच्या समभागात मोठय़ा घसरणीचा प्रवास राहिलेला असल्यानेच याचा परिणाम शेअर बाजारातील कामगिरीवर पडला आहे. मात्र एचसीएल टेक, इन्फोसिस आणि मारुती सुझुकीचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजारांमधील नकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारात घसरण राहिली आहे. जागतिक बाजारावर प्रामुख्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या घोषणेचा प्रभाव राहिलेला आहे. जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय आणि हाँगकाँगसह दक्षिण कोरियातील सोल व जपानचा टोकीओ बाजार नुकसानीत राहिलेला आहे. युरोपच्या प्रमुख बाजारात प्रारंभीच्या काळात घसरण राहिली होती. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूडचा भाव 0.26 टक्क्मयांनी घसरुन 42.11 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.