8 हजार 264 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात ठिकठिकाणी देशी- विदेशी दारुच्या अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी 8 हजार 264 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेणोली स्टेशन, ता. कराड गावच्या हद्दीत तेथीलच तानाजी निकम याच्या कडून 1 हजार 284 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या, कलेढोण, ता. खटाव गावच्या हद्दीत अभिजित स्नॅक्स सेंटर जवळ तेथीलच अरुण बुधावले याच्याकडून 2 हजार 24 रुपयांच्या देशी- विदेशी दारुच्या बाटल्या, सुभाषनगर खातगुन, ता. खटाव येथे रमेश मानसिंग मदने याच्याकडून 884 रुपये किंमतीच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
कोंजावडे, ता. पाटण गावच्या हद्दीत तेथीलच जितेंद्र नारायण आवळे याच्याकडून 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या, पाडळी हेळगाव, ता. कराड गावच्या हद्दीत मनेश सदाशिव अवघडे याच्याकडून 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या, बेलावडे, ता. कराड गावच्या हद्दीत विजय हरिबा जाधव याच्याकडून 624 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या, खंडाळा गावच्या हद्दीत मराठी शाळेच्या पाठीमागे जयचंद्र हरिश्चंद्र गायकवाड याच्याकडून 780 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या, सोळशी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत श्रीकांत सतीश यादव याच्याकडून 988 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.