तालुक्यातील 11 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. असे असले तरी दररोज रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी जिह्यामध्ये 17 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यामध्ये तालुक्मयातील 11 जणांचा समावेश असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने प्रसिध्द केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत चालली आहे. ही बाब चांगली आहे. पूर्णपणे कोरोना अजूनही गेलेगा नाही. तेंव्हा प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या थंडी सुरू असून रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. जनतेने गांभीर्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाचे कोणतेच नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी शहरातील विश्वेश्वरनगर, रामतीर्थनगर, श्रीनगर, होसूर, शिवाजीनगर, हनुमाननगर, नेहरुनगर, सदाशिवनगर, अंजयेनयनगर, या परिसरात रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात कानट्टी आणि इतर गावांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र या आजारापासून प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे.