प्रतिनिधी / बेळगाव
कोविडग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत देण्यात येत आहे. कोणी कोविड सेंटर उभारून रुग्णांना मदत देत आहेत, कोणी हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देऊन मदत करत आहेत. बबन भोबे मित्रमंडळाने जीवनदीप फौंडेशनला धान्यरुपी मदत देऊ केली आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. त्यामुळे जीवनदीप फाउंडेशनच्यावतीने कोविड सेंटरमध्ये असलेल्या स्टाफ नर्स, डॉक्टर्स आणि रुग्णांना जेवण देऊन मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. सदर मदत बबन भोबे मित्र मंडळाच्यावतीने किरण परब, राजू परब, श्रीकांत धनुचे, रवी धनुचे, अनिल बोकडे, किसन पाटील, सूरज गवळी, मारुती धनुचे, किशोर गवळी, अजित गवळी यांच्याकडे देण्यात आली.