कंटेनर चालक गंभीररित्या जखमी
नेमळे /वार्ताहर-
झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर नेमळे येथे दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. गोव्यावरुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या आयशर कंटेनरने समोरील डंपरवर जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनरचा ड्रायव्हर अजय त्रिवेदी (कर्नाटक )गंभीर जखमी झाला. कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी,महामार्ग पोलीसानी त्वरीत अॕम्बुलन्स बोलावुन उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठवून दिले. यावेळी महामार्ग पोलीस एपीआय अरुण जाधव, हवालदार गोसावी, चिंदरकर, नाईक, करवंदे, काबळे, पाटील, बुथेलो, उपस्थित होते.