वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सोमवारपासून सुरू झालेल्या प्राग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताकची पेत्र क्विटोव्हाला पहिल्याच फेरीत स्लोव्हाकियाच्या श्रमकोव्हाकडून पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्लोव्हाकियाच्या रिबेका श्रमकोव्हाने क्विटोव्हाचा 7-6 (7-5), 3-6, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात सर्बियाच्या स्टोजानोव्हिकने रशियाच्या डिटेचेंकोचा 6-7 (5-7), 6-1, 6-3, बेल्जियमच्या मिनेनने इटलीच्या माँटीकोनचा 6-0, 4-6, 6-1, अमेरिकेच्या ग्रेसी मिनने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरचा 6-3, 2-6, 6-3, अमेरिकेच्या आसिया मुहम्मदने ऑस्ट्रेलियाच्या कॅबरेराचा 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.