राकेश टिकैत यांना देण्याची मागणी
मेरठ
राकेश टिकैत यांच्यावर कर्नाटकात शाईफेक झाल्याने भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मेरठमध्ये धरणे आंदोलन करून भाकियू कार्यकर्त्यांनी टिकैत यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. टिकैत यांना सुरक्षा न मिळाल्यास शेतकरी रस्त्यांवर उतरतील असे या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिल्यावर म्हटले आहे. राकेश टिकैत यांना सुरक्षा न मिळाल्यास सरकारी अधिकाऱयांना घराबाहेर पडणे अशक्य करू. रस्ते आमच्या शेतात असल्याने आम्ही काहीही करू शकतो असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.