डिचोली/प्रतिनिधी
डिचोली ते अस्नोडा या मुख्य रस्त्यावर व्हाळशी येथे रवि. दि. 15 नोव्हे. रोजी संध्या. 4.30 वा. अल्टो कारने पार्क करून ठेवलेल्या बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात सर्वण डिचोली येथील सिद्धार्थ अनंत सावंत (43) या इसमाचा जागीच मृत्यू झाला.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. डिचोलीहुन अल्ट? कार घेऊन जाणाऱया सिद्धार्थ ने पार्क करून ठेवलेल्या बस क्रमांक जीए 03 एन 3711 ला धडक दिल्याने हा अपघात घडला. त्यात कारचे खुप नुकसान झाले व चालक सिद्धार्थ जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले.
तर या अपघातात मयताची पत्नी सुदैवाने वाचली.
डिचोली पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवण्यात आला. निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.