प्रतिनिधी /पणजी
म्हापसा येथील डॉ. गुरुदास नाटेकर यांनी लिहिलेल्या औषधनिर्मिती विषयावरील इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी पणजी येथील आयएमबी सभागृहात झाले. इन्स्टिटय़?ट मिनेझीस ब्रागांझा, लायन्स क्लब ऑफ म्हापसा आणि भालचंद्र प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रकाशन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदेमंत्री ?ड. रमाकांत खलप, विशेष निमंत्रित गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळय़?कर, तर प्रमुख वक्ता म्हणून शास्त्रज्ञ तथा साहित्यकि डॉ. नंदकुमार कामत, तसेच इन्स्टिटय़?ट मिनेझीस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांदेकर यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती स्तवनाने झाली. यावेळी इन्स्टिटय़?ट मिनेझीस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांदेकर याचे स्वागतपर भाषण झाले. तदनंतर डॉ. नाटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळय़?कर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात गोव्यातील फार्मा उद्योगासंबंधी उहापोह केला. त्यानंतर प्रमुख वक्ते शास्त्रज्ञ तथा साहित्यकि डॉ. नंदकुमार कामत यांनी पुस्तकावर सखोल विवेचन केले.
पुस्तकाचे शीर्षक ’स्टडी ऑन अप्लकेशन ऑन कॉम्पटीशन लॉ अण्ड इन्ट?लेक्चुअल प्रोपर्टी पॉलिसीज इन इंडियन फार्मा सेक्टर’ असून, डॉ. नाटेकर यांनी पी.एच डी.साठी केलेल्या संशोधनावर आधारित हे पुस्तक उत्तराखंडमधील ’झोफेन्सर पब्लकेशन’ने प्रकाशित केले आहे. डॉ. नाटेकर यांचे हे तेविसावे पुस्तक आहे. नाटेकरांनी 40 देशांचा दौरा करून त्या देशातील फार्मास्य?टिकल इंड्स्ट्रीज, युनिव्हर्सिटीमध्ये भेट दिली आहे. देशातील विविध राज्यांच्या फार्मास्य?टिकल उद्योगाचा अभ्यास केला आहे. नाटेकर यांचे ह्या विषयावरील लेख विविध देशांच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम. फार्म संशोधनावर आधारित केले आहे.