ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एक हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ठाणे मोहाली येथे माजी मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते विक्रम सिंह मजीठिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मजीठिया यांच्यावर एनडीपीएस कायदा, 25, 27 ए आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
2013 मध्ये पंजाब पोलिसांनी हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. या प्रकरणात बॉक्सर विजेंदरही चर्चेत होता. तर अटक करण्यात आलेला किंगपिन माजी डीएसपी जगदीश भोला याने ड्रग्ज रॅकेटमध्ये मजीठिया यांचा सहभाग असल्याचे मीडियासमोर सांगितले होते. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा हडकंप झाला होता. त्यानंतर पंजाब काँगेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू ह मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मजीठिया यांची चौकशी करण्याठी दबाव आणत होते. अखेर मजीठिया यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एआयजीच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी प्रकरणाची आता चौकशी केली जाईल. एजी अहवालावरील सात वर्षांच्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करेल, असे सांगितले जात आहे.