प्रवीण जाधव/ रत्नागिरी
संगीतच नव्हे तर सर्वच बाबतीत आपल्याकडे पाश्चिमात्य गोष्टींचे अनुकरण करण्याकडे कल राहिला आह़े असे असले तरी आता काळ बदलत असल्याचे दिसून येत आह़े तरूणाईमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल गोडी वाढताना दिसून येत आहे. प्रत्येक पिढीत संगीतामध्ये काही बदल केल्यास आगामी काळ शास्त्रीय संगीतासाठी सुवर्ण काळ असेल असे मत महेश काळे यांनी ‘तरूण भारत’ जवळ बोलताना व्यक्त केल़े
स्वरसंध्या मैफलीच्या निमित्त रविवारी काळे हे रत्नागिरी येथे आले होत़े यावेळी रत्नागिरीकरांचे कौतुक करताना काळे यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये आपण कायमच कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असत़ो मागील दोन वर्षे कोरोनामुळे याठिकाणी कार्यक्रम घेता आले नाह़ी आता पुन्हा एकदा नव्या जोशाने सुरूवात झाली आह़े कोकणातील माणसे हापूस आंब्याप्रमाणे मधूर आहेत़ याठिकाणी कार्यक्रम करत असताना लोकांमध्ये असलेली शास्त्रीय संगीताबद्दलची आवड जाणवत असत़े याठिकाणी मुंबई, पुण्यासारखे नियमित शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत नाहीत़ त्यामुळे जेव्हा आपण याठिकाणी येतो तेव्हा रत्नागिरीकरांचा प्रतिसाद आपल्याला भारावून टाकणारा असाच असतो, असे ते म्हणाले.
शास्त्राrय संगीताचा अभ्यास आपण लहानपणापासूनच करत आलो आह़े असे असले तरी कटय़ार काळजात घुसली या संगीत नाटकावर आधारित चित्रपटामुळे आपली ओळख निर्माण झाल़ी संगीत नाटकांमध्ये आता काहीतरी नाविन्यपूर्ण निर्माण होणे गरजचे आह़े किती वर्ष आपण तेच तेच लोकांपर्यंत पोहचविणार आहेत़ जुनं ते सोनं आहेच पण आता नव्याचा ध्यास धेतला पाहिज़े प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे काळे यांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या संगीताचा अभ्यास करा
पाश्चिमात्य संगीत हे सुद्धा चांगलेच आह़े नवीन पिढीच्या हातात आपल्याला गिटार असल्याचे दिसून येते. यामध्ये कोणतेही गैर नाही. संगीताची साधना तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकत़ा गिटारमध्ये देखील सारेगमच वाजत असत़े त्यामुळे शास्त्रीय संगीताबरोबर इतर प्रकारची साधना करू शकत़ा संगीत तुम्ही कशा प्रकारे आत्मसात करून लोकांपर्यत पोहचविता हे अत्यंत महत्वाचे आह़े सर्व प्रकारच्या संगीताचा तरूण पिढीने अभ्यास कराव़ा संगीताला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा असत नाहीत़ आपणही पाश्चिमात्य गाणी गात असतो मात्र आपले प्रेम हे कायमच शास्त्रीय संगीत हेच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
रत्नागिरी आवडते शहर
कार्यक्रम करताना काही विशेष तयारी करण्याची आपल्याला आवश्यक्ता वाटत नाह़ी नेहमीचा रियाज आपल्यासाठी पुरेसा असत़ो शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दिवसेंदिवस वाढणे गरजेचे आह़े आपल्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असत़ो रत्नागिरी हे माझे आवडत्या ठिकाणांपैकी एक आह़े याठिकाणी कार्यक्रम करत असताना वेगळाच आनंद मिळत असत़ो लोकांचे प्रेम हीच माझी अनमोल भेट ठरत असत़े तेच प्रेम, आशीर्वाद घेऊन मी पुढील प्रवासाला जात असतो.