शाळा-कॉलेज बंद, परीक्षा रद्द; चेन्नईसह 7 जिल्हय़ांना दणका
चेन्नई / वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये गेल्या आठवडाभरापासून सक्रिय ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडत आहे. हवामान खात्याने शुक्रवारी राजधानी चेन्नईसह 7 जिल्हय़ांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळविरोधी वातावरणामुळे हवामान बदलले आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील 24 तासांत ते चेन्नई किनाऱयाकडे सरकणार असून त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाच्या इशाऱयामुळे शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता शिक्षण विभागाने शाळांच्या काही परीक्षा रद्द केल्या आहेत. आता या परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबरला होण्याची शक्मयता आहे. अहवालानुसार, राजधानी चेन्नईमध्ये पुढील 3 दिवसांत 200-300 मिली पाऊस पडण्याची शक्मयता आहे. त्याचवेळी, काही भागात हे प्रमाण 400 मिलीपर्यंत वाढू शकते. पावसाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने 23 जिल्हय़ांमध्ये विशेष बंदोबस्त सुरू केला आहे. सर्व जिल्हाधिकाऱयांना परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवडय़ात तामिळनाडूत पावसाच्या दणक्याने तिघांचा बळी गेल्याची नोंद झालेली आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी राजधानी चेन्नईसह 7 जिल्हय़ांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे तामिळनाडूप्रमाणेच पुदुच्चेरीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन रंगस्वामी यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील 24 तासांत ते चेन्नई किनाऱयाकडे सरकणार असून त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुदुच्चेरीमध्येही शाळा, महाविद्यालये बंद
पुदुच्चेरीमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी पुदुच्चेरी आणि कराईकलमधील शाळा आणि महाविद्यालये शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मुसळधार पावसामुळे केंद्रशासित प्रदेशातील अनेक भागात पाणी साचले आहे.
आंध्रप्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा
कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी सकाळपर्यंत तामिळनाडू-पुदुच्चेरी किनारपट्टीच्या दिशेने सरकेल. त्यानंतर, ते 12-13 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू-पुदुच्चेरी आणि केरळच्या दिशेने पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल. 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, रायलसीमा आणि दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात जोरदार पावसाची शक्मयता आहे. तर 11-14 नोव्हेंबर रोजी केरळमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.