निफ्टी 10,400 च्या वरती : जागतिक बाजारातील सकारात्मक परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी म्हणजे बुधवारी भारतीय शेअर बाजारात घसरणीला ब्रेक लावत जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरणाच्या जोरावर मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सने 499 अंकांची उसळी नोंदवत बाजारात उत्साह निर्माण केला. याच दरम्यान एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी यांच्या समभागांनी समाधानकारक कामगिरी करत तेजी नोंदवली.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स 498.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 35,414.45 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,430.05 वर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारावेळी सेन्सेक्सने 35,467.23 चा उच्चांक पार केला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्मयांनी नफ्यात राहिले आहेत. सोबत बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयटीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र दुसरीकडे एनटीपीसी, नेस्ले इंडिया, लार्सन ऍण्ड टुब्रो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि ओएनजीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झालेत.
व्यापाऱयांच्या दृष्टीकोनातून शेअर बाजारासंदर्भातील बाबी आणि जागतिक बाजारांच्या निर्देशांकावर होणारा अन्य गोष्टींचा परिणाम यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. याचा गोड प्रभाव म्हणून जगभरातील शेअर बाजारामध्ये तेजीचा माहोल पहावयास मिळाला आहे. यामध्ये प्रमुख्याने आशियातील शांघाय आणि हाँगकाँगच्या बाजाराचा समावेश होतो