प्रतिनिधी/ फोंडा
तिस्क उसगांव येथे दुचाकी व कारगाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. केशव सोमा गवंडा (29,रा. तिस्क उसगांव मूळ. कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात शनिवार उशिरा रात्री घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत केशव रातपाळीच्या डय़ुटीवरून घरी परतत असताना हा अपघात घडला. तो जीए 05 क्यू 0725 दुचाकीने एमआरएफहून तिस्क येथील घरी परतत होता. तिस्क उसगांव येथील गांजेश्वरी टायर हाऊसजवळ पोचला असता समोरून येणाऱया कारगाडीची जीए 01 ई 1565 समोरासमोर धडक झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन हाकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सचिन नागवेकर याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.