ठळकवाडी हायस्कूलच्या शिक्षकांची कला
बेळगाव : अनेक चित्रकार विविध रांगोळय़ांच्या माध्यमातून अनेक चित्रे काढतात. पण ठळकवाडी हायस्कूलचे चित्रकला शिक्षक मारुती आंबेवाडकर यांनी केदनूर येथे शिवजयंतीनिमित्त रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे त्रिमिती (थ्रीडी) चित्र काढून तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.
मारुती आंबेवाडकर यांनी आपल्या घरात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे त्रिमिती चित्र साकारून त्यांना मानाचा मुजरा सादर केला आहे. हे चित्र त्यांनी दोन दिवसात पूर्ण केले. आठ दिवस हे चित्र पाहण्यास खुले ठेवले आहे.