कोरोनाबाधितांचा उंच्चाक, दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकला
प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालांत मंडळातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱया दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी जोरदार मागणी फोंडा येथील दादा वैद्य परीसरात एकवटलेल्या वीस जणाच्या विद्यार्थ्यांच्या गटाने केली. सदर मागणीसाठी आज सोमवार सकाळी 9.30 वा. गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयासमोर व मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी निदर्शने करण्यात येणार असल्याचा ईशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे सचिव अहराज मुल्ला उपस्थित होते. राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व त्यांच्या कुटूंबियांची सुरक्षिततेच्या दृष्टीने बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने सुमारे 500 विद्यार्थ्यांनी गुगल मिटद्वारे पाठिंबा दर्शविला आहे. आज होणाऱया निदर्शनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सुमारे 100 विद्यार्थी सहभागी होणार आहे.
कोरोनाच्या सावटात दहावी व बारावीचे बहुतेक वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेतले. सद्या कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे पुढे ढकलून मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी नसून सद्यपरिस्थितीत कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांक गाठत असल्यामुळे तात्पुरत्या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे.