1 एप्रिलपासून सर्व पेमेंट सेवा ऑनलाईन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
1 एप्रिल 2023 पासून दिल्ली एम्समध्ये सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होतील. या व्यवहारांसाठी सर्व काऊंटर्सवर ‘युपीआय’ व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड आणि कार्ड पेमेंट सुरू केले जाणार आहे. तसेच, एम्सने नवीन आणि जुन्या प्रकरणांच्या ओपीडी नोंदणीसाठी आयुष्मान भारत आरोग्य खात्याचा आयडी वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंबंधीची अंमलबजावणी येत्या सोमवारपासूनच केली जाणार असली तरी येत्या तीन-चार महिन्यात सर्व व्यवहार ऑनलाईन माध्यमातूनच केले जाणार आहेत. 21 नोव्हेंबरपासून एका ओपीडीमध्ये सुरू केलेली ही योजना 1 जानेवारीपासून एम्स नवी दिल्लीच्या सर्व ओपीडीमध्ये मिशन मोडमध्ये सुरू होईल.