ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 36 हजार 035 वर पोहचली आहे. यामधील 1,112 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 179 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 24 हजार 044 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 11 लाख 45 हजार 161 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 34,102 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,145 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.