ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दिल्लीत या विधानसभेसाठी 1 कोटी 46 लाख मतदार मतदान करणार आहेत. 13 हजार 750 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे.