ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेला पोलीस अधिकारी देवेंद्र सिंगच्या चौकशीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, नक्की कोण या दहशतवाद्यांना शांत करू पहात आहे. एनआयएकडे तपास सोपवून देवेंद्र सिंगने ‘शांत’ बसावे, यासाठीच हे प्रकरण एनआयएकडे देण्यात आले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
तसेच एनआयए प्रमुख योगेश मोदी हे सध्या एनआयएचे प्रमुख आहेत. त्यांच्या अखत्यारीत असणाऱया एनआयए देवेंद्र सिंग प्रकरणी योग्य तपास करतील का सवाल राहुल यांनी केला आहे.