दिवसभरात 41 हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद : 581 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा उदेक कमी होत आहे. मात्र, दुसरीकडे काही जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने देशाची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे 41 हजार 806 नवे रुग्ण आढळून आले. तर 581 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 39 हजार 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाख 32 हजार 41 वर गेली आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 87 हजार 880 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3 कोटी 01 लाख 43 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 4 लाख 11 हजार 989 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 4 लाख 32 हजार 041 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आतापर्यंत देशात लसींचे 38 कोटी 99 लाख 41 हजार 086 डोस देण्यात आले आहेत. अखेरच्या एका दिवसात बुधवारी दिवसभरात 35 लाख 89 हजार 316 जणांनी लस घेतल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.