वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुका कोरोनामुक्त असून तो तसाच राहावा, यासाठी तालुका प्रशासनाने प्रयत्न ठेवावेत. गणेशोत्सवात तालुक्यात येणाऱया चाकरमान्यांसाठी तसेच गोव्यात नोकरीकरिता ये-जा करणाऱया युवक-युवतींसाठी दोडामार्गात कोविड टेस्टिंग सुविधा शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे दोडामार्ग तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी यांच्यासह नगरसेविका आदिती मणेरीकर, रमेश दळवी, आनंद तळणकर, बाळा कोरगांवकर, श्यामसुंदर चांदेलकर, भरत गवस, महादेव बोर्डेकर, नवनाथ आयनोडकर, गोविंद टेंबकर, कृष्णा डिचोलकर, शंकर देसाई, मिलिंद नाईक यांनी सोमवरी प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांची भेट घेतली व गणेशोत्सव कालावधीतील तसेच गोव्यात नोकरी कामानिमित्त ये-जा करणाऱया युवक-युवतीवरून चर्चा केली. दोडामार्ग तालुक्याला कोरोनाचे संकट सुदैवाने नाही. ही परिस्थिती तशीच ठेवण्यासाठी प्रशासनाने आणखी आवश्यक ते सर्व उपाय करणे आवश्यक आहे. येणाऱया गणेशोत्सवात अनेक चाकरमानी दोडामार्ग तालुक्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शासनाचे मोफत स्वरुपात कोविड टेस्टिंग करून देण्याची सुविधा निर्माण करावी. गोव्यात दोडामार्ग तालुक्यात अनेक युवक-युवती दररोज नोकरीनिमित्त ये-जा करतात. त्यांच्यासाठी देखील दोडामार्गात कायमस्वरुपी कोविड टेस्टिंग सुविधा शासनाने मोफत करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.