प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळावरून 423 विदेशी पर्यटकांनी मायदेशी प्रयाण केले. हे पर्यटक रशिया व लंडनकडे रवाना झालेले असून आता जवळपास 6 हजार विदेशी पर्यटकांनी गोव्यातून मायदेशाकडे प्रयाण केले आहे.
गोव्यात लॉकडाऊननंतर अडकून पडलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यास प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत 29 खास हवाई सेवांव्दारे जवळपास 6 हजार विदेशी पर्यटकांना पाठवण्यात आलेले आहे. मंगळवारी मध्यरात्री 168 पर्यटकांनी रशियाला प्रयाण केले. तर बुधवारी संध्याकाळी 255 पर्यटकांनी लंडनला प्रयाण केल्याची माहिती दाबोळी विमानतळ सुत्रांकडून मिळाली.