नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने रिटर्न दाखल केला नसल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये जवळपास 1.63 लाखापेक्षा अधिकजणांची जीएसटी नोंदणी रद्द केली असल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे. यामध्ये 21 ऑगस्ट ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 720 इतक्या व्यवहारांच्या स्वरुपात चुकीच्या पद्धतीने बनावट नोंदणी देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तब्बल 55 प्रकरणांमध्ये विसंगती प्राप्त होत असल्याने यातून काही बाबीचा खुलासा स्पष्ट होत नसल्याचे नमूद केले. बनावट कंपन्यांनी नफा कमाईच्या कारणास्तव हा गोंधळ घातला असून खोटय़ा व्यापाऱयांनी केलेल्या गैर कारभारांचा शोध प्राप्तिकर विभागाने घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी विभागांच्या अधिकाऱयांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान 1,63,042 जीएसटी नोंदणी रद्द केल्या आहेत. सदरच्या व्यापारी-व्यावसायिकांनी मागील सहा महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीपर्यंत जीएसटीआर-3बी रिटर्न दाखल केला नसल्याची माहिती आहे. यामुळे सदरची कारवाई जीएसटी विभागाने केलेली आहे. 1 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या करदात्यांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत आपला जीएसटीआर-3बी रिटर्न सादर न करणाऱया 28,635 करदात्यांची पडताळणी केली असून यासंदर्भात सर्व जीएसटी आयुक्त कार्यालयांनी स्वतःहून जीएसटी रद्दची प्रक्रिया सुरु केल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
Next Article सौदीचे कर्ज फेडण्यासाठी चीनकडून कर्ज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.