तीन उमेदवारांचे अर्ज अवैद्य
प्रतिनिधी /वाळपई
एका नाटय़मय घडामोडीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या केरी सत्तरी येथील पारवडेश्वर दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी शेवटी महादेव मांगेलकर यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी दाखल केलेल्या तीन उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱयांनी अवैध ठरविल्यामुळे महादेव मांगलेकर यांची बिनविरोध निवड झाली .यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या संस्थेच्या चेअरमन पदासाठी लागलेली चुरस याला पूर्णविराम मिळालेला आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील केरी या ठिकाणी कार्यरत असलेल्या पारवडेश्वर दूध उत्पादक संस्थेच्या चेरमेनपदासाठी सहकार खात्याने निवडणूक निश्चित केली होती. आज बुधवार दिनांक 7 जुलै रोजी ही निवडणूक जाहीर केली होती. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याच्या साखळी विभागाचे अधिकारी सतीश सावंत यांची नियुक्ती केली होती. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला. चेअरमनपदासाठीच्या निवडणुकीमध्ये बऱयाच प्रमाणात चुरस निर्माण झाली होती .यामुळे एकूण सहा संचालकांपैकी एकूण चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यात सहदेव पार्सेकर निलेश पार्सेकर किशोर गावस महादेव मागेंलकर यांचा खास करून समावेश होता. तर उर्वरित दोन संचालक समीर गोवेकर व बाबु फाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. निवडणूक अधिकाऱयांनी यासंदर्भाची छाननी प्रक्रिया पूर्ण करताना सहदेव पार्सेकर, निलेश पार्सेकर किशोर गावस या तिघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविले. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सहदेव पार्सेकर यांचा उमेदवारी अर्ज सूचक व अनुमोदक यांच्याशिवाय अर्धवट अवस्थेत होता. तर निलेश पार्सेकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बाबू फाळे यांची सही होती मात्र अनुमोदक न्हवता. तर किशोर गावस यांच्या उमेदवारी अर्जावर समीर गावस यांनी सूचक म्हणून सही केली होती मात्र अनुमोदक नव्हता. महादेव मागेंलकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज परिपूर्ण अवस्थेत होता. किशोर गावस यांची सूचक तर समीर गोवेकर यांची अनुवादक म्हणून त्याच्या अर्जावर सह्या होत्या .यामुळे हा अर्ज अवैध ठरवून महादेव मांगेलकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सतीश सावंत यांनी घोषित केले.
दरम्यान या संस्थेचे चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी अनेकांचे लक्ष लागले होते .यामुळे निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयामध्ये सुरू असताना संस्थेच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात सभासद व तमाम नागरिकांनी गर्दी केली होती. यासंस्थेच्या चेअरमन पदावर कुणाची निवड होते याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काहीना चेअरमनपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांची हरकत होती .कारण काही वर्षांपूर्वी यासंस्थेमध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला होता. यामुळे ही संस्था अनेकांच्या चर्चेचा विषय बनलेली होती. आजच्या निवडणुकीमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनला. दरम्यान याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित चेअरमन महादेव मांगेलकर यांनी सांगितले की संस्थेच्या भवितव्यासाठी व सभासदांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणार असून या संस्थेच्या उत्कर्षासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.