बाइकवरून कोसळल्याने हाड प्रॅक्चर
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि हॉलिवूड स्टार निक जोनास अलिकडेच सिंगिंग रियलिटी शो ‘द व्हॉइस’च्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निक जोनासला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो घरी परतला आहे.
शोच्या लाइव्ह एपिसोडदरम्यान निकने या घटनेविषयी माहिती दिली आहे. मला आता पूर्ण बरं वाटत आहे. बाइकवरून पडल्याने माझ्या पायाच्या हाडात प्रॅक्चर झाले होते. याचबरोबर काही अन्य जखमा झाल्या होत्या असे त्याने म्हटले आहे.
निकने शोच्या चित्रिकरणात पुनरागमन करत सेटवरील स्वतःचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओवर त्याचे चाहते व्यक्त होत आहेत.