प्रतिनिधी/ चिपळूण
श्री केळमाई- वाघजाई देवी क्रीडामंडळ निर्व्हाळ वाघेवाडी आयोजित कुणबी चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेवर गणेश कृपा दहिवली संघाने नाव कोरले. श्री दतकृपा कौंढरताम्हणे संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेत 34 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या दहिवली संघाला 7001 रुपये, तर उपविजेत्या कौंढरताम्हाने संघाला 5001 रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरणप्रसंगी कुणबी समन्वयक समितीचे अध्यक्ष सहदेव बेटकर, कुणबी युवा चिपळूण तालुकाध्यक्ष भाई कुळे, डॉ. मनोज रावराणे, कृष्णा हरेकर, रामचंद्र हरेकर, कुणबी युवा संघटक भरत धुलप, कमलाकर ब्रीद, वसंत वाघे, माजी सरपंच संतोष वाघे आणि शशिकांत वाघे आदी उपस्थित होते. समालोचन वैभव पवार आणि अमित आदावडे यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विश्वास वाघे, रुपेश वाघे, संतोष घाणेकर, योगेश वाघे, शुभम वाघे, अभिजित घाणेकर, रोहित घाणेकर, सर्वेश वाघे, विशाल वाघे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन संतोष वाघे यांनी केले.